विकृत मानसिकता...अहो थोडी तरी माणुसकी दाखवा ! रेल्वेत चक्‍क लाथा मारुन खाली पाडले जातेय

Foto
औरंगाबाद : रेल्वेमध्ये विविध शहरातील प्रवासी प्रवास करत असतात. प्रचंड गर्दी असल्याने जागा मिळविण्यासाठी प्रवासी धडपड करत असतात. गर्दी असल्याने अनेकांना नियम तोडून रेल्वेच्या दरवाजात उभे राहून प्रवास करावा लागतो. परंतु दरवाज्यातही काही प्रवासी एकमेकांना दादागिरी करत जागेसाठी वाद घालतात. इतकेच नव्हे तर आता चक्‍क लाथा मारुन काही प्रवासी रेल्वेखाली पाडले जात असल्याचे चित्र समोर आले आहे. यामुळे माणुसकी गेली कुठे? असा प्रश्‍न सर्वत्र उपस्थित झाला आहे.

रेल्वेमध्ये प्रवास करताना नेहमीच प्रवासी एकमेकांना जागेसाठी भांडताना दिसतात. दरवाज्यात बसूनही प्रवास करतात. त्याचा परिणाम अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. इतकेच नव्हे तर काही प्रवाशांमध्ये माणुसकी शिल्‍लक राहिली की नाही? असाही प्रश्‍न आता सर्वत्र उपस्थित होताना दिसत आहे. विकृत मानसिकतेमुळे एखाद्या प्रवाशाचा जीव जाऊ शकतो. हेही आता लक्षात घेण्याची गरज आहे. एका प्रवाशाने जागेसाठी दुसर्‍या प्रवाशाला लाथा मारुन रेल्वेखाली फेकल्याचे विदारक चित्र नुकतेच समोर आले आहे. यात त्या प्रवाशाचा जीव गेला असता तर....? अशीही खंत व्यक्‍त केली जात आह;े. याआधीदेखील अशा घटना समोर आल्या आहेत. रेल्वेत जागेवरुन एकमेकांना तलवार मारण्यासाठी काढण्यात आल्या होत्या. याशिवाय अनेकदा महिला प्रवासीही भांडण करताना आढळून येतात. या भांडणाच्या नादात एखाद्या प्रवाशाचा जीव जाऊ शकतो. याचाही विचार करण्याची गरज आहे.

थोडी तरी दाखवा ना माणुसकी?
विकृत मानसिकतेमुळे रेल्वे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ज्येष्ठ नागरिकांनाही याचा त्रास सहन करावा लागतो. काही ज्येष्ठ नागरिकांनाही रेल्वेत जागा असताना बसण्यासाठी जागा दिली जात नाही. काही जण रेल्वेत आरक्षण सीट असल्यासारखे झोपूनच राहतात. त्यामुळे रेल्वेत जागा असूनही अनेकांना उभे राहून प्रवास करावा लागतो.थोडी तरी माणुसकी दाखवायला हवी. माणुसकीच्या नात्याने एकमेकांना रेल्वेत प्रवाशांनी समजून घेतले तर प्रत्येक प्रवाशाचा सुखकर प्रवास होऊ शकतो. त्यामुळे माणुसकी दाखवा असे आवाहनही रेल्वे प्रशासनाकडून, रेल्वे पोलिसांकडून करण्यात येत आहे.

कशासाठी दरवाज्यात उभे राहतात?
रेल्वे दरवाज्यात उभे राहून प्रवास करु नये, असे वारंवार रेल्वे प्रशासन सांगत असते. तरीही अनेक जण सूचनांकडे पाठ फिरवीत दरवाज्यात उभे राहूनच प्रवास करता. काही जण जाणून-बुजून फोनवर बोलत दरवाज्यातही उभे राहून प्रवास करतात. यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. त्यामुळे दरवाज्यात उभे राहून प्रवास करु नये व आपला अनमोल जीव धोक्यात घालू नये, असे आवाहनही रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker